..आणि कळी उमलायला लागली...

..आणि कळी उमलायला लागली…
   
       वस्ती भागात अनेक महिला व मुली घरबसल्या कामं करत असतात. त्यातलं एक काम म्हणजे वर्क केलेल्या कापडावर टिकल्या लावणं. येताजाता खाली मान घालून काम करणारी ती चिमुरडी दिसायची.दहा वर्षांची…खाली मान घालून काम आणि काहीतरी चघळणे सुरू… काय खात असेल ही सतत…
       एका कार्यकर्त्या ताईंनी तिचं काम जवळ जाऊन बघितलं.तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला. पण काही बोलायला तयार नाही! खाली मान घालून हसण्याशिवाय काहीच नाही! खोदून खोदून विचारल्यावर लक्षात आलं ती गुटखा चघळत होती! फक्त दहाच वर्षांची मुलगी गुटखा चघळत होती!!!
         तिच्या घरच्यांना समजावून सांगून आणि तिलाही कधी समजावून, कधी समज देऊन ही सवय दूर केली. तिच्या हिताची तळमळ आणि रोजचा सहवास वाईट मार्गावरून तिला परत आणू शकला!

आयुष्याच्या खडतर मार्गावर वाटचाल करणाऱ्या अशा कितीतरी कळ्या किशोरी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून आता उमलायला लागल्या आहेत.

Seva Samvand

 

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *