एक थरार नाट्य असंही!

शानदार संगीत सभा चालू होती. सभागृह प्रेक्षकांनी भरलेलं होतं. अचानक फोन वाजला. समोरून भयभीत आवाज आला. नमस्ते… आम्ही दोन महिला व आमच्यासोबत दोन लहान मुलं लिफ्टमध्ये अडकलो आहोत… आम्हाला बाहेर काढा… वाचवा…

केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिराच्या व्यवस्थापकास लिफ्टमध्ये लावलेल्या संपर्क यादीतून दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या महिलेने केला होता. समयसूचकता दाखवत नाट्यमंदिराच्या व्यवस्थापकाने आपल्या सहकाऱ्यांसोबत RESCUE OPERATION सुरू केले.

आत अडकलेल्या महिलांशी संवाद साधून योग्य त्या सूचना देऊन सहकाऱ्यांनी आश्वासित केले. एकीकडे बंद पडलेली लिफ्ट सुरू करण्यासाठी संपूर्ण सभागृहाचे लाईट बंद करून पुन्हा सुरू करावे लागणार होते. दुसरीकडे संगीतमैफिल रंगात आलेली होती.

कार्यक्रम कसा थांबवावा…. प्रचंड टेन्शन..!

परंतु पूर्ण सभागृहाची लाईट बंद न करता कौशल्याने फक्त लिफ्टची लाईट काही वेळा पुरता बंद करून पुन्हा सुरू करण्यात आली आणि अडकलेल्या महिलांना व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

आमचे कसे होईल… कसे बाहेर पडणार… कोण काढणार ? असे अनेक प्रश्न मनात असताना इतक्या तत्परतेने कारवाई करून सुटका केल्याबद्दल महिलांनी डोळ्यातील अश्रूंसह कृतज्ञता व्यक्त केली.

छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर खरंतर व्यावसायिक मनोरंजनाचं दालन. परंतु आलेल्या प्रसंगातसुद्धा जबाबदारीचे भान ठेवून तत्परतेने केलेले सहकार्य हे सेवाभाव वृत्तीतूनच येते. केशवस्मृती सेवासंस्था समूहातून अशा सेवाभावी कार्यकर्त्यांची फळी कार्यरत आहे.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *