तिमिरातुनी तेजाकडे जाणारी मायेची प्रकाशमय वाट... आश्रय - माझे घर

ईश्वराने हाती दिलेल्या दानात अपूर्णांक जोडलेलेच नव्हते. त्यामुळे पुत्र प्राप्तीचा आनंद घेण्याऐवजी गतीमंद तुषारचा योगक्षेम कसा चालवावा ह्या चिंतेने आईचे काळीज गलबलून गेले.
त्याच्या पाठच्या भावाचा आणि बहिणीचा विवाह झालेला. त्यांना त्यांच्या प्रपंचातून सवड मिळेना आणि वडिलांच्या पश्चात उतार वयातील आईला चाळीशीतील तुषार माणूस म्हणून कसा जगेल याची चिंता पोखरून टाकत होती.

त्या पुढे अपूर्णांकात भर पडली. करोनाच्या साथीत त्याच्या भावा बहिणीला देवाज्ञा झाली. तुटपुंज्या आधारला धरून कशीबशी उभी असलेली तुषारची आई पार कोसळून गेली.
अशात त्यांना केशवस्मृती प्रतिष्ठान च्या आश्रय – माझे घर या संस्थेविषयी माहिती कळाली.

तुषारच्या मावशीने आणि आईने तुषार आश्रय च्या आश्रयाला आणून सोडले. सुरवातीला त्यांच्या मनात धाकधूक होती. पण कालांतराने गतीमंद तुषारची प्रगती पाहून त्यांचा विश्वास दुणावला.

तुषारला कायमस्वरूपी ‘आपले घर’ मिळाले. आज तो आश्रय संस्थेत रमला आहे. आपल्यानंतर या मुलाचे काय होणार या चिंतेने ग्रस्त आणि अनेक व्याधींनी त्रस्त असलेल्या तुषारच्या एकट्या रहाणार्‍या आईला आणि मावशींना नेहमीसाठी स्वस्थता लाभली आहे.

Seva Swand 20 June 2022

 

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *