पाच वर्ष बाल सुरक्षेची...

कार्यालयाच्या एका खोलीत गडबड सुरु होती. दोन तीन कार्यकर्ते जोरजोराने काही बोलत होते. बाकीचे त्यांच्या समोर उभे राहून काही ऐकत होते, हसत होते. प्रमुख कार्यकर्ता चौकशी करण्यासाठी त्यांच्याजवळ गेल्यावर सर्वच जण शांत बसले. विचाराल्यावर एका जण उत्साहात म्हणाला सर, आज १५० वे लग्न मोडून आलो. खूप दांगडो झाला. स्थानिक आमदारांचा फोन आला होता सर, पण आम्ही कायदा काय म्हणतो ते सांगितले तेव्हा ते म्हणाले कायद्यात काय बसते तसे करा. लग्नघरात जास्त त्रास होणार नाही असे बघा. लहान वयातील लग्नाची १५०वी केस सोडविल्याबद्दल एक आत्मीक आनंद त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

‘चाईल्ड लाईन’च्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. आपण केवळ नोकरी करत नाही तर लहान मुलांच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक वळणावर त्यांच्या नकळत होणाऱ्या त्यांच्या आयुष्याची परवड आपण थांबवतो आणि तीही कायद्याने, याचा अभिमान त्यांना वाटतोच पण विशेषत: ग्रामीण भागात स्थानिक राजकीय नेतेमंडळी, नगरसेवक, आमदार यांना देखील आपण कायद्याच्या आधारे प्रसंगाचे गांभीर्य पटवून देऊ शकतो. याने त्यांचा आत्मविश्वास दुणावतो.

बघता बघता चाईल्ड लाईन सुरु होऊन पाच वर्ष पूर्ण झाली. १५१ बालविवाहा बरोबरच ९९ हरवलेली बालके, १०२ लैंगिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक अत्याचार, १३ मानवी तस्करी, २०८ जणांना वैद्यकीय उपचार मदत, १२२ जणांना सुरक्षित निवारा, ५२ जणांचे समुपदेशन, ३२५ जणांना आर्थिक मदत तर ५७ पालकांनी देखील आपल्या मुलासाठी मदत घेतली आहे. आजमितीस १९३९ म्हणजे प्रतिदिवशी किमान १ मुल अशी चाईल्ड लाईनने मदत केली आहे. मदत करायला नेहमी तत्पर राहू पण असे बाल विवाह मोडण्याची, अत्याचार रोखण्याची वेळ येऊच नये अशी इच्छा मनी घेऊन हे काम सुरु आहे…

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *