वृद्धाश्रम ते आनंदाश्रम...

एक प्रवास यात्रा

२५ वर्षापूर्वी जळगाव शहरापासून आठ किलोमीटर लांब असणाऱ्या एका रानावर जेष्ठांसाठी एक निवारागृह बांधायचे ठरले. जाण्यायेण्यासाठीचा मातीचा रस्ता, दळणवळणाची अपुरी सोय, कमी मनुष्यबळ, पाण्यासारख्या अत्यावश्यक नैसर्गिक सुविधांचा अभाव पण गरजू वृध्दांसाठी काही करण्याची उमेद यातून उभा राहिला मातोश्री वृद्धाश्रम…

वृद्धाश्रम सुरु झाला आणि वृद्धांच्या समस्यांची, मानवी स्वभावाच्या अनोळखी कंगोऱ्यांची नवी ओळख व्हायला लागली. अस म्हणतात की म्हातारपण हे लहान मुलांसारखेच असते. लहान मुले ही निरागस, निर्मळ असतात, जगाच्या व्यवहाराचा त्यांचा परिचय नसतो पण वृद्धांनी मात्र जग रहाटीचा अनुभव घेतलेला असतो, तो इतरांना दिलेलाही असतो. राग लोभ ,मोह ,माया या चक्राची पुरेशी ओळख होऊन ते वृद्धाश्रमात आलेले असतात. चार जणांच्या कुटुंबात आजी आजोबांचे परिस्थितीपेक्षा ही मन:स्थितीने राहणे हे होत नसल्याने बरेच जण वृद्धाश्रमाची पायरी चढतात. त्यामुळे त्यांना सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. ही कसरत गेली २५ वर्ष न थकता वृद्धाश्रमाचे संचालक मंडळ करत आहे.

अडलेल्या, अडचणीतल्या वृद्धांची सोय म्हणून सुरु झालेला वृद्धाश्रमाचा प्रवास आता जेष्ठांना आवश्यक असणाऱ्या दैनंदिन जीवनातील आवश्यक सुविधांबरोबरच आरोग्य,मनोरंजन आणि स्वत:च्या अध्यात्मिक गुंतवणूकीच्या पुरेशा सोयीनी युक्त झाला. आता रोज नवा दिवस नव्या उत्साहाने सुरु होऊ लागला.. वृद्धाश्रमाची रौप्यमहोत्सवी वाटचाल आता आनंदाश्रमात परावर्तित झाली आहे.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *