रात्रीच्या गर्भात असे
उद्याचा उष:काल
*रमेश वय वर्ष १० आणि कविता वय वर्ष ७ आनंदाने चाललेले या कोवळ्या मुलांचे आयुष्य कोरोनाने काळवंडले. कोरोनामुळे आई-वडीलांच्या मृत्यूने हसत्या खेळत्या घरावर आणि त्यांच्या भविष्यावर देखील गडद अंधाराची छाया पसरली. चाईल्ड लाईनच्या स्वयंसेवकांना ही बातमी कळताच सर्व शासकीय योजनांची परिपूर्ती करून त्यांना लगेचच पाच लाखाची मदत केली गेली आणि त्यांची नाव बालसंगोपन योजनेत सामील झाली. आता दोघेही आपल्या मामाकडे पुण्याला शिक्षण घेत आहेत.*
कोरोनाचा कालखंड आपल्या आयुष्यातून निघून गेला. पण त्याच्या आठवणीने आजही अंगावर काटा येतो. अनेकांनी घर, नोकरी, व्यवसाय गमावले पण त्यापेक्षाही अनेकांनी आपली जवळची माणसे गमावली. वृद्धांचे मरण एकवेळ समजू शकतो पण ज्यांची आयुष्यच अजून उमलायची आहेत *त्या मुलांच्या दृष्टीने तर त्यांच्या आई-वडिलांची ‘मरणाने सुटका केली… पण त्यांना मात्र … जगण्याने छळले होते…’* असे झाले होते. महिला, वृद्ध, विधवा, अपंग इ. समाजातील गरजू घटकांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. त्यातीलच बालसंगोपन योजना ही एकल पालक व अनाथ मुलांसाठी राबविली जाते. कोविडमुळे अनेक बालकांचे पितृछत्र हरपून एकल पालक किंवा अनाथ झाले. या कालावधीत शासनाने घरातील कर्ता पुरुष किंवा आई-वडील दोघांचेही निधन झाल्यास निराधार पालक योजना सुरु केली. या योजनेंतर्गत त्या मुलांना दरमहा रु. 1100/- मिळणार आहेत. मात्र ही योजना शासकीय असल्याने सामान्य लाभार्थी पर्यंत पोहोचण्यास बरेच अडथळे पार करावे लागत. चाईल्ड लाईन सदस्यांनी गावोगावी, शाळेत जाऊन बालसंगोपन योजनेची माहिती देऊन जनजागृती केली.
*केशवस्मृती चालवत असलेल्या चाईल्ड लाईनने गेल्या दोन-अडीच वर्षात शासन दरबारी सादर केलेल्या प्रकरणामुळे मा. बालकल्याण समिती व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने सुमारे 225 रमेश व कविता सारखी बालके योजनेचा लाभ घेत आपल्या भविष्याची उज्वल वाट चालत आहेत.*
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान