माणुसकीची दृष्टी
‘ताई तुम्ही डोळे बसवले नसते तर माझी नोकरी गेली असती. सगळ घर माझ्यावर अवलंबून आहे.’ शाळेत शिपाई असलेला विलासभाऊ नेत्रपेढीच्या राजश्री डोल्हारेनां आत्मीयतेने सांगत होता. डोळ्यांची मोफत शत्रक्रिया झाल्याने त्याच्या मनावरचे आर्थिक संकट देखील दूर झाले होते. ज्या कोणी डोळे दान केले आहे अशा अज्ञात व्यक्तीच्या कुटुंबियांचे आभार मानत तो नोकरीत पुन्हा रुजू झाला.
सुवर्णालंकार स्व.रतनलाल बाफनांचे मोठे भाऊ स्व.मांगीलालाजी बाफना यांच्या मृत्युनंतर त्यांच्याच इच्छेने डोळे दान करण्यासाठी एकही नेत्रपेढी जळगाव जिल्ह्यात नव्हती. ही उणीव भरून काढायचे रतनलाल बाफनांनी ठरवले. नेत्रपेढीसाठी आवश्यक सामुग्री आणून ती उभी करणे त्यांना सोपे होते पण सेवा भावाने ती चालविणे हे केवळ केशवस्मृतीच करू शकते हे ते जाणून होते.त्यामुळे ती सुरू करण्यासाठी दादा आचार्यांनी आपली जागा देऊ केली आणि मांगीलालाजी बाफना नेत्रपेढी आणि चिकित्सालयाची सुरवात झाली.
१,७८,५९८ नेत्र तपासणी, ७९९५ अत्यल्प किमतीतील शस्त्रक्रिया, ५५५ नेत्रदान आणि २४० व्यक्तीना सृष्टी बघण्यासाठीची दृष्टी देण्याचे काम करत नेत्रपेढीने आता रोप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. डोळे बसवून देण्यापलीकडे त्यांचे घर संसार सुरळीत करण्याबरोबरच माणुसकीची दृष्टी देण्याचे नेत्रपेढीचे कार्य अविरतपणे सुरु आहे.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान