ज्योत से ज्योत जगाते चलो...

‘डाॅक्टर आपकी वजहसे बच्चा बच गया । आपने नही बोला होता तो उसकी दोनो आँख चली जाती ।’ हात जोडून उभे असलेले रझाक चाचा नेत्रपेढीच्या डाॅक्टरांना सांगत होते. त्यांच्या पाच वर्षाच्या नातवाचे डोळे आणि जीव नेत्रपेढीच्या डाॅ.धिरज बडाले यांच्या प्रयत्नामुळे वाचले होते.

नेत्रपेढीच्या मुख्य रस्त्यावर रझाक चाचाची फळ विक्रीची गाडी आहे. नातवाचे डोळे बरेच दिवस दुखत असल्याने त्याला दाखवायला चाचा नेत्रपेढीत आले होते. डोळे तपासतानाच डॉक्टरांच्या लक्षात आले की आजार काही वेगळा आहे. डाॅक्टरांनी लगेचच हॉस्पिटलमधून डोळ्याचे स्कॅनिंग करून घेतले आणि डॉक्टरांची शंका खरी ठरली. मुलाच्या डोळ्यात गाठ होती. गाठ कसली आहे हे कळल्याशिवाय पुढे काहीही करणे धोक्याचे होते. यासाठी एल.व्ही.प्रसाद आय इनस्टिट्यूटला जाणे गरजेचे होते. डोळ्यातील गाठीमुळे मुलाच्या जीवितास धोका असल्याचे निदान झाले. त्यामुळे डॉक्टरांनी डोळा काढण्याचा निर्णय घेतला. हैद्राबादला गेलेल्या चाचाला गाठ असलेल्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नव्हता. त्याने पैशाचे काही करता येईल का? अशी विनंती नेत्रपेढीच्या व्यवस्थापिका राजश्री डोल्हारेंना केली. मॅडमनी एल.व्ही.प्रसादशी केलेल्या संपर्कामुळे तेथील डॉक्टरांनी मोफत शस्त्रकीया केली.मुलाला घेऊन चाचा पुन्हा जळगावला आले.पाच वर्षाच्या त्या मुलाच्या जीविताचा धोका आता टळला आहे.

सामाजिक काम म्हणजे जे काही आपल्याला करता येणे शक्य आहे ते कोणतीही अपेक्षा न ठेवता करावे. ज्योत से ज्योत जगाते चलो..प्रेम कि गंगा बहाते चलो.. या वृत्त्तीने मदतीची ही ज्योत एकाने दुसऱ्याला आणि दुसऱ्याने तिसऱ्याला अशीच लावत जाण्याचा हा वसा घेऊन काम करण्याची दृष्टी घेऊन नेत्रपेढी आज २४ वर्षापासून कार्यरत आहे.

 

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *