मानवतेची सेवा
“सर, दिवाली की शुभकामनाये ! आपके लिए मिठाई लाई है ! सुबहसे तीन बार आपको मिलने के लिए आके गये! आपको मिलके ही जाना ऐसा तय करके आपकी राह मे कबसे बैठे है ।” रफिक भाई बोलत होता. त्याची पत्नी व त्यांचा थॅलेसिमियाग्रस्त मुलगा यांनी व्यवस्थापकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा तर दिल्याच पण सर्वांसाठी मिठाई देऊन ते घरी जायला निघाले.
थॅलेसेमिया, हा रक्तातील दुर्धर आजार. फारसा लोकांना माहीत नसलेला. परंतु अनुवंशिक, माहितीचा अभाव, समाजातील कुप्रथा व आपल्याच मानवी चुकांमुळे जन्माला घातलेल्या निष्पाप बालकांना झालेला आजार. थॅलेसेमियाग्रस्त बालकांना दर महिन्याला, पंधरा दिवसातून किंवा आठवड्याला नियमित एक, दोन किंवा तीन आवश्यकतेप्रमाणे रक्त पिशव्या द्याव्या लागतात. अनेक वेळा रक्तपेढीत तुटवडा असल्यास वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास अशा मुलांच्या जीवावरही बेतते. गोळवलकर रक्तपेढीने सुरू केलेल्या थैलेसिमिया पालक रक्तदाता योजनेतून नियमित रक्त मिळत असल्याने अशी वेळ आता येत नाही.
या आजारावरील उपचाराचा खर्च देखील तसा सामान्य कुटुंबातील रुग्णाला न परवडणारा. आजारावरील शेवटचे उत्तर म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सारखा अत्यंत खर्चिक उपचार. या उपचाराआधी त्यासंबधीची चाचणी घ्यावी लागते ती HLA सारख्या तपासणीने. रक्तपेढीच्या माध्यमातून अशा रुग्णांना व त्यांच्या पालकांना सुविधा व्हावी म्हणून मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने महाराष्ट्राच्या १८ जिल्ह्यातील १९३ मुलांची मोफत तपासणी केली गेली. आता महिन्यातून दोन वेळा अशा रुग्णाची तपासणी करण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. थॅलेसेमियाच्या या प्रकल्पाने जात,धर्म, पंथाच्या पुढे जाऊन अशी मानवतेची सेवा करण्याचे व्रत अखंडपणे सुरु आहे.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठा