बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना...

‘साहेब तुम्ही असल्यामुळे आमचे तीन लाख वाचले. पुन्हा अशी चूक होणार नाही. मुलाचे लग्न योग्य वयाच्या मुलीशी लावून देऊ. ’चाईल्ड लाईनच्या समन्वयकाला नवऱ्यामुलाचा मामा सांगत होता. साखरपुड्यातच लग्न मोडले आणि भावी नवऱ्याकडील मंडळी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागली.

२६ वर्षाच्या समीरचे लग्न नक्की होत नव्हते. दिसायला बेतास बात, उंचीने कमी असलेल्या समीरला लग्न करण्यास जातीतली मुलगी जिल्ह्यात मिळाली नाही आणि मग जिल्ह्याबाहेरील निशाचे स्थळ आले. पोरीचे लग्न लवकर लाऊन दिले तर जबाबदारी संपेल, या हेतूने नाकीडोळी चांगली आणि दिसायला सुंदर असलेल्या १६ वर्षाच्या निशाच्या आई बापाने मध्यस्थाला लग्नाचे हो सांगितले, मात्र मुलाचे ध्यान लक्षात घेऊन त्यांनी मध्यस्था मार्फत ३ लाखांची मागणी केली.

मुलीच्या घरी साखरपुडा ठरला आणि त्याच दिवशी चाईल्ड लाईनच्या टिमला बालविवाहाची बातमी समजली. साखरपुड्याच्याच दिवशी टिमने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठरलेले लग्न मोडले. मुलाकडील मंडळीना कमी वयाच्या मुलीशी लग्न का करताय हे विचारल्यावर मुलगी लहान होती हे माहित नव्हते, तिचे वय मोठे सांगितले होते, मागणी करून देखील आधार कार्ड त्यांनी दिले नाही. उलट आमच्याकडून पैसे घेतले, असे सांगितले. चाईल्ड लाईनटीमने पैश्याचे विचारल्यावर नाही म्हणणाऱ्या मुलीच्या वडिलांना समीरच्या GPayने तीन टप्प्यात पाठवलेल्या पैशाच्या नोंदी दाखवल्यावर मात्र पैशासाठी मुलीचे लवकर लग्न करून देण्याचे मान्य केले.

चुकीने लागलेल्या कोणत्याही लग्नात बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असल्यासारखे जाऊन बेकायदेशीर बालविवाह मोडून शेकडो मुलींची आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचविण्याचे चाईल्ड लाईनचे काम अव्याहतपणे सुरु आहे.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *