झाले मोकळे आकाश...
घरातील लग्नाचा धुमधडाका संपला आणि विजयला बाबांची आठवण आली. त्याने आनंदाश्रमात फोन केला.
‘बाबा लग्न चांगले झाले, सर्वजण तुमची आठवण काढत होते. तुम्ही कसे आहात. बरे आहात ना? दोन तीन दिवसात तुम्हाला घ्यायला येतो.’ आजोबा मुलाशी बोलले, त्यांना भरून आले. पण लग्न कार्य नीट पार पडले हे ऐकून मनातून सुखावले. दोन दिवसात घरी जायचे आहे हा विचार करत पुन्हा वृद्धाश्रमातील खोलीकडे वळले.
विजयच्या मुलीचे लग्न ठरले. बडोद्याला होणाऱ्या लग्नाची तयारी सुरु झाली. सर्वांना एकाच काळजी होती. आजोबांचे काय करायचे. ८५ वर्षाच्या आजोबांकडे आता लग्नात वावरण्याची ताकद नव्हती. आजारपण आणि वृद्धत्व या दोन्ही मुळे घरात एकटे राहण्याची परिस्थिती देखील नव्हती. काय करावे हा सर्वांनाच प्रश्न होता आणि कोणीतरी मातोश्री आनंदाश्रमाचे नाव सुचविले.
सुरवातीला बाबांना वृद्धाश्रमात ठेवणे हा विचारच कोणाला पटेना, पण चौकशी तर करू अशा एका निर्णयावर सर्वजण तयार झाले. वृद्धाश्रमातील व्यवस्थापकाने अशा आजी आजोबांसाठी केलेली पर्यायी निवास व्यवस्थेची माहिती दिली. त्यांची पाळली जाणारी पथ्य, औषधोपचार या विषयातील सर्व काळजी या संबंधी सांगितले. सर्वांना थोडे मोकळे वाटले. आजोबांना सुद्धा सुरवातीला थोडे अवघडल्यासारखे सारखे झाले होते. पण सर्वांनी धीर दिला आणि आनंदाश्रमातील पहिल्या दिवसाच्या अनुभवताच त्यांचे अवघडलेपण नाहीसे झाले. बघता बघता १०-१२ दिवस कसे गेले हे समजलेच नाही. आता तर घरी जायची वेळ देखील आली.
घरातील अशा लग्नसमारंभात, सहज कुठेतरी काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जायचे म्हटले की पहिली आठवण आणि काळजी वाटते की घरातील आजारी, वृद्ध असलेल्या आई बाबांचे कसे होईल आणि मग कोणीतरी त्यांच्यासाठी घरी थांबतो नाहीतर बाहेर जाण्याच कार्यक्रम तरी रद्द होतो. त्यातून होणारी घरातल्यांची अनवट घुसमट मनावर अंधाराचे जाळे करून जाते. मातोश्री आनंदाश्रमाच्या पर्यायी निवास व्यवस्थेमुळे मात्र अशा अडचणीतील सर्वांच्याच मनात फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश… ही भावना रुंजी घालू लागली आहे.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान
Very good Social work sir.