मन करा रे प्रसन्न.. सर्व सिद्धीचे कारण...

घरातील प्रत्येक बाबतीत मला विचारले गेलेच पाहिजे, माझ्या सहभागाशिवाय कोणत्याही गोष्टी होऊ नयेत, असे वर्षभरापूर्वी वाटणाऱ्या निलीमाताईची मानसिक चाचणी झाली आणि त्यांचे गुण चांगले आले. स्वत:मध्ये काहीतरी बदल झाला आहे असे नुसतेच वाटणाऱ्या निलीमाताईना आता गुणांचा आधार मिळाला. चाचणी घेणाऱ्या शिक्षकांशी बोलतांना लक्षात आले की वर्षभर सामुपदेशाचा जो कोर्स आपण करत आहोत त्याचा पहिला परिणाम आपल्यावरच झाला आहे. सर्व ठिकाणी ‘मीच’ यापासून आपण बरेच दूर आलो आहोत. वयाच्या साठी नंतर आपल्यातला हा बदल त्यांना सुखाऊन गेला. आता आपण समुपदेशक होण्याच्या मार्गावर नक्कीच चालू शकतो असे त्यांना वाटले.

 कोरोना काळात घुसमटलेल्या मनांना बोलते करण्यासाठी केशवस्मृतीने ‘चला बोलूया मनातलं !’ नावाने एक हेल्प लाईन,समुपदेशन केंद्र सुरु केल. बऱ्याच जणांना बोलण्यासाठी कोणीतरी हवे होते,त्यांची सोय झाली. केशवस्मृतीच्या कार्यकर्त्याना मात्र समाजातील या गरजेची जाणीव झाली आणि गरजेवरती काम करणाऱ्या प्रतिष्ठानने कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या अंतर्गत समुपदेशन मानसशास्त्र पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु केला.

अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने मंजूर केलेल्या जागा देखील कमी पडल्यामुळे वाढीव कोट्यात सुरु झालेला हा कोर्स समाजाची या विषयातील गरज दाखवतो. याक्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच,नोकरदार, गृहिणी, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर,शिक्षक, प्राध्यापक, यासारख्या व्यावसाईक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी देखील या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला तो स्वत:साठी. पू.वामनराव पै यांनी सांगितल्या प्रमाणे ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ ही मनोभूमिका ठेऊन आजच्या धावपळीच्या जगात आपले चित्त स्थिर करत जमल्यास इतरांना मदत करुया या भावनेने हा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत.

Seva Samvad-27

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *