हाताला हात आणि गरजूला साथ...

सोडावॉटरची हात गाडी चालवत गोपाळने आपला संसार उभा केला होता. बळवंत पतसंस्थेतून घेतलेल्या कर्जातून मागील काही वर्षात त्याने हातगाडीचे रूप तर पालटले होतेच पण आता प्लॉट घेऊन नवीन घर देखील बांधले. त्या घराची आज वास्तुशांत होती. गोपाळने आयुष्यभर मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाले. वास्तुशांतीला गेलेल्या बळवंत पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांच्या मनात देखील त्यांच्या डोळ्यासमोरच उभ्या राहिलेल्या गोपाळच्या आयुष्याचा चढता पट सुखावत होता.

२०००च्या दशकात महाराष्ट्रात पतसंस्थांचे भरघोस पिक आले होते. तालुक्यातील गल्लीबोळात देखील बापू, अप्पा, नानासाहेबांच्या नावाने पतसंस्थांच्या नावाचे बोर्ड लागले होते. सावकारी करणारी नवी यंत्रणा उदयास आली. जळगाव जिल्हा देखील त्याला अपवाद नव्हता. कालांतराने शासनाने केलेल्या पतसंस्थांच्या ऑडीटने ही परिस्थिती बदलली आणि बघता बघता पतसंस्थांचे हे साम्राज्य ढासळून गेले. संचालक अडचणीत आलेच पण ज्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई थोड्या जास्त व्याजासाठी ज्या पतसंस्थांमध्ये ठेवली ते आयुष्यातून उठले.

याच कालखंडात स्थापन झालेल्या बळवंत पतसंस्थेने मात्र सुरवातीपासून आजपर्यत ‘अ’ ऑडीट वर्ग घेत, १५% लाभांश देत ठेवीदारांचा विश्वास सार्थ केला. समाजात लौकिकार्थाने आर्थिकदृष्ट्या ‘पत नसलेल्या माणसांची पत वाढवायची’ हा वसा घेऊन काम करणाऱ्या बळवंतच्या खात्यात सायकल दुरुस्ती, चहा-नास्त्याची टपरी ते हातगाडी चालवून आयुष्य चालविणाऱ्या अनेकांच्या वास्तुशांतीला जाण्याचे खूप प्रसंग जमा झाले आहेत. वॉर्ड स्तरावर सुरु झालेल्या बळवंतचे आता जिल्हा कार्यक्षेत्र झाले आहे. वृक्षसंवर्धन, रुग्णसाहित्य वाटप यासारख्या सामाजिक उपक्रमांबरोबरच पूर्णतःसंगणकीकृत होत आधुनिकतेकडे प्रवास करत JLG गट माध्यमातून ३ हजार महिलांना ५ कोटीपेक्षा जास्त कर्ज देणारी पहिली पतसंस्था म्हणून देखील आपला वेगळा ठसा उमटविला आहे. ४२ कोटींचा व्यवसाय असणारी बळवंत खान्देशातील पहिली ISO मानांकित पतसंस्था म्हणून कार्यरत आहे.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *