आखाडे पुन्हा तालमीने फुलू लागले....

पोलीसांनी मैदानापासून गर्दी लांब करण्यासाठी थोडा लाठीचा प्रसाद दिला आणि कुस्ती बघायला आलेली माणसे मैदानापासून सुरक्षित अंतरावर पांगली. गर्दीतला कुस्ती बघायला आलेला चेतन लांब उभा राहून कुस्ती बघू लागला. मूळचा फुटबॉलपटू असलेला चेतन त्याच्या पैलवानकी केलेल्या बापाच्या आग्रहामुळे दंगल बघायला आला होता. पोलिसांच्या एका दंडुक्याने त्याचा उत्साह थोडा मावळला, पण बाबाला बरे वाटावे म्हणून शेवटपर्यंत त्याने कुस्ती बघायचे ठरवले. कुस्तीतल्या डावांचे गारुड हळूहळू त्याच्या डोक्यात भिनायाला लागले.रात्री शेवटची कुस्ती झाली आणि चेतनने ठरवले आपण आता कुस्ती खेळायची… चार वर्षानी आता चेतन महाविद्यालय स्तरावर जिल्हा ,राज्य स्तरावरील कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊ लागला.

दिवाळी झाल्यावर तुळशीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या रथोत्सवानंतर कुस्ती दंगलीची जळगावची परंपरा काही वर्षांपासून बंद झाली होती. खंडित झालेली ही परंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी केशवस्मृतीच्या कार्यकर्त्यांनी जळगावात पुन्हा कुस्ती दंगल सुरू करण्याचे ठरवले. सुरवातीला आखाडे आणि त्यातील  पैलवानांना या दंगलीच्या यशस्वीतेसाठी मैदानावर उतरविण्यात बरीच ताकद खर्ची पडली.पण पहिल्या दोन वर्षातच आमची पण  कुस्ती लावा असे सांगणाऱ्या पैलवनांची संख्या मात्र वाढली.

आज केवळ जळगाव , महाराष्ट्रच नाही तर मध्यप्रदेश. हरियाणा, दिल्ली येथील पैलवानांची कुस्ती जळगावात व्हायला लागली आहे. त्यांना बघून आता चेतन,रवी,विलास बरोबरच भाग्यश्री, कविता देखील कुस्ती खेळू लागले आहेत. जुन्या उस्तादा नुसार जळगावातील आखाडे पुन्हा कुस्ती तालमीने फुलू लागले आहेत.

 

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *