मी अविवेकाची काजळी । फेडूनी विवेक दीप उजळी

दिवाळी सण मोठा… नाही आनंदाला तोटा…..आसमंतात आनंद ,उत्साह आणि उर्जा आणणारा हा सण… दु:ख,दैन्य,निराशेला भेदून प्रकाशकिरणे पसरवणारा हा सण…दिन दिन दिवाळी ..गाई म्हशी ओवाळी…गाईम्हशी कुणाच्या..लक्ष्मणाच्या…..लक्षमण कुणाचा ….आई बापाचा ……म्हणत निसर्गातील सर्व प्रतीकांबरोबर मानवी नात्यातील संबध दृढ करणारा हा सण..

केशवस्मृती समुहातील सर्वच प्रकल्प समाजातील अभावाच्या जागा शोधून तेथे आपल्या कामाचा प्रकाश पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. गरजूंच्या आयुष्याच्या पोकळीतील अंधार भरून काढण्यासाठी समाजातील सर्वांचेच हात ते दिवे उजळविण्यास पुढे येतात. या प्रकाशलेल्या हातांची संख्या पुढील काळात वाढवूया.

ज्ञानेश्वरांनी म्हंटल्या प्रमाणे …मी अविवेकाची काजळी । फेडूनी विवेकदीप उजळी
तै योगिया पाहे दिवाळी ।। निरंतर ।।*
आपल्या मनावरील असलेली अज्ञानाची ..अविवेकाची काजळी प्रयत्नाने दूर करून विवेकाचे,ज्ञानाचे दीप लाऊया. सर्वांचे आयुष्य प्रकाशमान करुया…

दीपोत्सवाच्या शुभेच्छा ……..

 

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *