चला विसावू या वळणावर...

सगळं असल्यावर देखील काही वेळेला काही तरी कमी आहे असे वाटणारे आणि मग त्या नसलेल्या आभासाचे दु:खं बाळगत दिवस कंठणारे बरेच जण असतात. एकटेच राहून नाम:स्मरणात,आध्यात्मिक मन:शांती मिळवावी असे वाटणारे वयस्कर देखील काही कमी नाहीत.

एके दिवशी सकाळी सुखवस्तू घरातील वाटणाऱ्या काकू आनंदाश्रामाच्या कार्यालयात आल्या. व्यक्तिगत राहण्याची व्यवस्था एवढीच त्यांची अपेक्षा. बाकी सर्वकाही आनंदाश्रामाच्या नियमानुसार चालणारे. सुदैवाने एक रूम देण्याची व्यवस्था झाली. आठ दिवसांनी आपण इथे रुळलो आहोत हे लक्षात येताच त्या व्यवस्थापकांशी बोलायला लागल्या. पतीच्या निधनानंतर मुलांचे शिक्षण,नोकरी, लग्न योग्यवेळी करून आता नातवंडांच्या गोतावळ्यात राहतानाही काही तरी उणे आहे असे सतत मनात यायचे. ती पोकळी शोधायला त्या साशंकतेनेच इथे आल्या आणि मोकळ्या झाल्या. आनंदाश्रामातील आपल्या समवयस्कर असलेल्या सर्वांशी बोलल्या आणि त्यांना सक्षात्कार झाला,आपले दु:खं खूपच लहान. मानवी स्वभावात इतरांचे सुख बघितल्याने आपले दु:खं कधीकधी वाढते आणि इतरांच्या दु:खाने आपले सुख कळते तसे झाले.

काय राहिले हे आजीना सांगण्याची गरजच पडली नाही. ‘‘मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी सहजपणाने गळले हो..जीवन त्यांना कळले हो’’..या बा.भ. बोरकरांच्या कवितेसारखे कोणत्याही बाहेरील समुपदेशकाची गरज न पडता आजी तीन महिन्यात पुन्हा एकदा आपल्या गोकुळात परतल्या. आता अधूनमधून आनंदाश्रामाविषयी कृतज्ञता आणि आश्रमातील आजी आजोबांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या सारख्या अनेक घरी गेलेल्यांचा फोन येतो. ‘मातोश्री आनंदाश्रम’ ही वयस्कर असलेल्या कोणालाही ‘चला विसावू या वळणावर’.. असे वाटणारी व्यवस्था आहे, पुन्हा आपल्या जिव्हाळ्याच्या गोतावळ्यात परतण्यासाठी….

 

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *