शिक्षणाची पायवाट हमरस्त्यात बदलली..
कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर विद्यार्थी विकास योजनेच्या अंतर्गत चालणाऱ्या वर्गात दरवर्षी १५/२० मुले अभ्यास करायला यायची. जून च्या तिसऱ्या आठवड्यात एके दिवशी भाग्यश्री आणि तिच्या बरोबरीच्या दोन तीन मुली काहीतरी बोलत कार्यालयाबाहेर उभ्या होत्या.
सहज उत्सुकता म्हणून काय रे, कसला विचार करताय? असे कार्यालयातल्या एकाने विचारले. भाग्यश्रीने घाबरतच सांगितले, “सर, आत्तापर्यंत शाळेतून पुस्तक भेटायची आता आम्हाला घ्यावी लागणार पुस्तकांचा खर्च जास्त आहे. खूप जणांना परवडणार नाही.आपल्याकडून मिळतील का सर?”
सगळ्यांनी मिळून विचार केला आणि ठरवले की या वर्षी पुस्तकांसाठी देणगी मिळवून यांची तर गरज भागवूया. त्या वर्षी काही मुलांना दिलेली मदत पुढे ‘आम्हालाही शिकायचं’ या योजनेत परिवर्तित झाली. कोरोनाच्या कालावधीत हातावर पोट असलेल्याना जीवन जगणे मुश्कील झाले होते. त्या काळात १२०० पेक्षाही जास्त मुलांना या योजनेतून वह्या, पुस्तकांचे वाटप केले.आजमितीस दरवर्षी किमान ५०० विद्यार्थी वह्या पुस्तकांबरोबरच काही विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठीच्या आर्थिक गरजा देखील या योजनेतून पूर्ण केल्या जात आहेत.
गरजू मुलांच्या शिक्षणिक वाटेवरचा उज्वल भवितव्याच्या प्रवासात सहाय्यभूत होण्याचे ठरवत समाजाच्या गरजांवर काम करण्याचा वारसा केशवस्मृतीच्या नव्या पिढीने ही जोपासला आहे.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,
केशवस्मृती प्रतिष्ठान