‘मिळून सार्‍या जणी बदलू जग आपुले’

‘मॅडम, नवीन योजना सांगा. आम्हाला काही तरी वेगळे करून दाखवायचं.’ झाशीची राणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा मुख्य शाखेत आल्यावर बचतगट विभागाच्या प्रमुखाकडे नेहमी तगादा लावत. कुणाकडे तरी स्वयंपाक करायला जाणार्‍या, शिलाई काम, घरकाम करणार्‍या महिलांच्या या बचत गटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष मात्र गृहिणी म्हणूनच आपले नित्य व्यवहार सांभाळत होत्या.  20 जणींचा सहभाग असलेल्या या बचत गटातील महिलांनी सातत्याने अंतर्गत कर्जातून आपले संसार नीट उभे केले होते. मागील 10 वर्षात यातील एकही महिला बचतगट सोडून गेली नव्हती.

‘My Pad My Right’ या सॅनिटरी पॅड निर्मिती विषयातील ‘नाबार्ड’च्या महत्वाकांक्षी योजनेत देशभरातील  30 बचत गटांची निवड करायची वेळ आल्यावर केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातून पाठवल्या गेलेल्या गटातून एकमेव ‘झाशीची राणी महिला बचत गटाची’ निवड झाली. काहीतरी करून दाखविण्याची जिद्द प्रत्यक्षात उतरली. लॉकडाऊनच्या काळातदेखील या महिलांनी जिद्दीने ग्रामीण रुग्णालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी आपले प्रशिक्षण पूर्ण करतानाच लक्षात आलेल्या समस्येवरील उपाय म्हणून Maternity Pad तयार करण्याची नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणली. सॅनिटरी पॅड तयार करण्याबरोबर त्याच्या विक्रीची व्यवस्था उत्पन्न करण्याची जबाबदारीदेखील गटाने यशस्वीपणे सांभाळली. बाजारात स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित करण्याची वाटचाल या महिला करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचा सन्मान म्हणून नाबार्डच्या दस्तावेजात या गटाच्या यशस्वीतेची नोंद घेण्यात आली.

जनता बँकेच्या 3700 बचत गटातील 60 हजारपेक्षा जास्त महिला ‘मिळून सार्‍या जणी बदलू जग आपुले’ या उद्देशाने आज एकत्र काम करीत  आहेत. आपला संसार करतानाच गृहिणी असलेल्या अशा अनेक आधुनिक झाशीच्या राणी  परिस्थितीशी झुंजत आज व्यावसायिक, उद्योजक म्हणून स्वत:ला बदलू पाहताहेत. हीच आहे नव्या भारताची ओळख.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

More from Sewa Samvad





Posted on
Keshavsmruti Pratishthan Sewa-Samvad-31




Posted on
ज़िन्दगी प्यार का गीत है… इसे हर दिल को गाना …




Posted on
sewa-samvad-29

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *