ज़िन्दगी प्यार का गीत है... इसे हर दिल को गाना पड़ेगा...
‘या मुलांच्या चेहऱ्यावरील निर्मळ हास्य बघितल्यावर लक्षात येते की, आपले चेहरे किती बनावटी आहेत. घरातले मागे लागले आहेत, फिरायला, देवदर्शनासाठी कुठेतरी बाहेर जाऊया. आता मी त्यांना नक्कीच बाहेर घेऊन जाईन, सुरवात मात्र ‘आश्रय – माझे घर’ पासून करेन.’ कार्यक्रमाला जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून मनापासून दाद दिली. मतिमंदाच्या कायम स्वरूपी निवारा असलेल्या ‘आश्रय-माझे घर’ च्या सहाव्या वर्धापन दिना निमित्ताने तेथे पहिल्यांदाच आलेल्या शशिकांत पाटलांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्वजण टाळ्या वाजवता वाजवता अंतर्मुख झाले.
मतीमंद, गतिमंद, स्वमग्न व्यक्तीचे घरात असणे त्याच्या वयात येण्याने हळू हळू अडचणीचे वाटू लागते. पोटचा गोळा असलेल्या वाढत्या वयातील मुलाच्या आणि भविष्याच्या काळजीने चिंताग्रस्त असलेल्या पालकांना ‘आश्रय’च्या रूपाने एका आशेचा किरण दिसला. २ मुलांना घेऊन सुरू झालेला ‘आश्रय-माझे घर’ चा प्रवास आता २३ मुलांसह सहा वर्ष वयाचा झाला आहे. ज़िन्दगी प्यार का गीत है… इसे हर दिल को गाना पड़ेगा अशा मन:स्थितीत असलेल्या पालकांच्या डोळ्यात, वर्धापन दिनाच्या निमित्ताने या मुलांचे आत्ताचे कुटुंबीय असलेल्या काळजीवाहक दादा आणि ममत्वाची पाखरण करणारे संचालक मंडळ ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना… यहाँ कल क्या हो किसने जाना म्हणत गाण्यावर ठेका धरून नाचताना बघून आनंदाश्रू ओघळू लागले होते. आता त्यांच्या मनातील मुलाच्या भविष्याची चिंता मिटली होती.
छान, आठवड्याच्या सुरुवातीलाच असे प्रोत्साहित करणारे काही वाचले, कळले तर मनात एक चैतन्य, ऊर्जा निर्माण होऊन पुढच्या काही दिवसात कामात एक जोश व आनंद असतो.
Excellent social work sir 👍