
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जळगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ करण्यात येणार आहे. कोविड सेंटरचे औपचारिक उद्घाटन आज सकाळी (दि. ११ मार्च २०२१ रोजी) १२ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव तीव्र वाढत चालला असून दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हि आपणा सर्वांच्या चिंतेची बाब झाली आहे. सुरुवातील होम आयसोलेशनला प्रशासनाने परवानगी दिली होती पण वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जिल्हा प्रशासनाला मदतरूप होण्यासाठी केंद्राचा प्रारंभ करण्यात आला आहे. कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णासाठी योगासन, सात्विक आहार, तज्ञ व प्रशिक्षीत डॉक्टरांचे उपचार आदि सुविधा असणार आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने श्री रत्नाकर पाटील, नंदू अडवाणी, सतिश मोरे, यांनी केले आहे.
Perday shula kay aahet?