“आम्हालाही शिकायचे आहे” केशवस्मृती प्रतिष्ठान चा उपक्रम

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या “आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गतजळगाव शहरातील ई. ९ वी व ई. १० वीच्या गरजू विद्यार्थ्यांना केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ३२ व्या वर्धापनदिनाच्या औचित्याने पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवी पेठेतील केशवस्मृती मुख्य कार्यालयात झालेल्या या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून स्टील होम चे संचालक भावेश मोदी, मातोश्री आनंदाश्रम चे संचालक श्रीकांत वाणी उपस्थित होते.


“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत जळगाव शहर व परिसरातील घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा चालक, विविध खाजगी कंपनी मध्ये काम करणारे रोजंदार यांच्या ई. ९ वी ते ई. १२ वी त जाणाऱ्या पाल्यांकरिता पाठ्यपुस्तक सहयोग योजना गत ९ वर्षापासून कार्यान्वित आहे. ज्यात आत्तापर्यंत एकूण २००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पुस्तकांचा लाभ घेतला आहे. दरवर्षी इ. ९ वी ते १२ वीच्या गरजू विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांमध्ये पाठ्यपुस्तक देण्यात येते. पहिल्या टप्प्यात ई. ९ वी ई. १० वी च्या दहावीच्या १०० विद्यार्थ्यांना पुस्तक देण्यात आले.


मुख्य अतिथी भावेश मोदी यांनी आपल्या प्रमुख भाषणात विद्यार्थी दशेतून बाहेर पडल्यावर पुस्तकांचे महत्व अधोरेखित केले आणि पुस्तकांचे व्यवस्थित जपवणूक करून पुढील वर्षी अन्य गरजूंना मदत करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांकडून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर येवले यांनी, सूत्रसंचालन विरभूषण पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी परेश सिकरवार, सचिन बोरसे, आयुष भागवतकर, निलेश चौधरी यांनी परिश्रम घेतले. पाठ्यपुस्तक नाव नोंदणीसाठी केशवस्मृतीच्या नवी पेठेतील मुख्य कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *