तिसरी घंटा…
‘केवढा मोठ्ठा हॉल आहे. बसायला चांगल्या खुर्च्यापण.. बरं झालं कार्यक्रमाला पैसे नव्हते, नाहीतर आपल्याला कुठे एवढ्या मोठ्या हॉल मध्ये निवांत बसायला मिळाले असते..’ केशवस्मृतीच्या कार्यक्रमाला आलेल्या सेवावस्तीतील दोन महिला हॉलमधून बाहेर पडता पडता एकमेकींना सांगत होत्या.
शहरात काही वर्ष सुरु असलेला बालगंधर्व संगीत महोत्सव असेल किंवा राज्य नाट्य स्पर्धा असतील, बंदिस्त नाट्यगृह असून देखील शासनाचे दर परवडत नाही म्हणून खुल्या नाट्यगृहात होत होत्या. पण आता सर्व सोयींनी सुसज्ज असलेल्या नाट्यगृहात परवडणाऱ्या शुल्कात हे कार्यक्रम होतात आणि जळगावकर नाट्यरसिक त्याचा अत्यंत आरामदायी वातावरणात त्याचा आस्वाद घेतात. जवळपास ३५ कोटी रुपये खर्च करून १२०० आसन क्षमता असलेले छ. संभाजीराजे नाट्यसंकुल करोना काळ सुरु होण्यापूर्वी ६ महिने केशवस्मृती समूहाच्या यादीत समाविष्ट झाले.
कलारसिक व जळगावकर नागरिक यांना परवडणाऱ्या शुल्कात ही वास्तू उपलब्ध करून मिळावी व जळगावची सांस्कृतीक भूक भागविण्याची गरज पूर्ण व्हावी या हेतूने खरं म्हणजे सामाजिक काम करणाऱ्या केशवस्मृतीने हे नाट्यगृह तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीस मान देऊन चालविण्याचे ठरविले. जगाला आर्थिक कोंडीत पकडणारा कोरोनाचा दोन वर्षाचा कालखंड संपला. या कालखंडात शासनाला देण्याचे भाडे कमी झाले मात्र बंद सभागृहाचे भरमसाठ वीजबिल मात्र संस्थेच्या पदरी पडले. पण कलासक्त नागरिकांना व कलोपासकांना एक तरी आशेची जागा जिवंत राहावी यासाठी संस्थेने तोही भर सोसला. आता कुठे तिसरी घंटा वाजली आहे आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने कलोपासक जळगावकर मंडळींच्या सेवेत नाट्यगृह रुजू झाले आहे…
केळीसाठी प्रसिद्ध सुवर्णनगरी जळगांव शहराला आता
सामाजिक दूरदृष्टी प्राप्त असलेल्या सेवाभावी कार्यकर्त्यांच्या योग्य नियोजनाने सर्वच क्षेत्रातील आदर्श सेवाप्रकल्पांमुळे आता जगात एक वेगळी ओळख प्राप्त होईल,,,
केशवस्मृतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन व मनस्वी शुभेच्छा,,,💐💐💐👍👍