जळगाव वृत्त : आगामी १० वर्षात जळगाव जिल्हा पूर्णपणे थॅलॅसिमिया मुक्त समाज करण्याचा निर्धार केलेल्या केशवस्मृति प्रतिष्ठान ला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी थॅलेसिमिया रुग्णांसाठी HLA TESTCAMP (बोनमॅरो क्रॉसमॅचिंगची तपासणी शिबीर) च्या उद्घाटन प्रसंगी केले.
केशवस्मृती प्रतिष्ठान तर्फे व पेरेंट्स असोसिएशन ऑफ यूनिट ट्रस्ट याच्या सहकार्याने आज सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ रोड जळगाव येथे थॅलेसिमिया रुग्णांसाठी HLA TESTCAMP (बोनमॅरो क्रॉसमॅचिंगची तपासणी शिबीर) आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय महाविद्यालय चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एच. चव्हाण, केशवस्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष भरत अमळकर, मुंबई येथील कोकिलबेन अंबानी हॉस्पिटलचे ओंकोलोजिस्ट व बोनमॅरो ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. शंतनू सेन, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. धर्मेंद्र पाटील, थॅलेसिमिया मुक्त समाज प्रकल्प प्रमुख डॉ सई नेमाडे उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालय चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र थॅलेसिमिया कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी केली. केशवस्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष भरत अमळकर यांनी केशवस्मृती प्रतिष्ठान च्या थॅलेसिमिया मुक्त जळगाव जिल्हा करण्याचा निर्धार केला असून संपूर्ण राज्यात माईलस्टोन ठरेल असा उपक्रम आम्ही राबवणार असल्याचे सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी सांगितले कि सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात सुमारे ४०० थॅलेसिमिया च्या केसेस असून या आजारासंदर्भात जनजागृती करण्याचे काम केशवस्मृती प्रतिष्ठान करत असून त्यांचना जिल्हा रुग्णालय सर्वतोपरी वैद्यकीय मदत पुरवण्याचे आश्वासन दिले. या वेळी ९३ थॅलेसिमियाग्रस्त बालकांची तपासणी करण्यात आली. परप्रांतातून तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून बालके व त्यांचे पालक आले होते.
कार्यशाळा – कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचे ओंकोलोजिस्ट व बोनमॅरो ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. शंतनू सेन यांनी थॅलेसिमिया आजारासंदर्भात घ्यावयाची काळजी व त्याचे नियोजन मार्गदर्शन केले व पालकांच्या विविध शंकाचे निरसन केले.
पुस्तक प्रकाशन – थॅलेसिमिया मुक्त समाज प्रकल्प प्रमुख डॉ सई नेमाडे लिखित थॅलेसिमिया प्रबंधन और नियंत्रण या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
लॉकडाऊन काळात थॅलेसिमियाग्रस्त बालकांना रक्तसंक्रमणाची अडचण निर्माण झाली होती परंतु प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल चे डॉ गौरव महाजन यांनी महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत या बालकांना रक्तपुरवठा उपलब्ध केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सई नेमाडे यांनी तर सूत्रसंचालन भानुदास येवलेकर, आभार प्रदर्शन डॉ धर्मेंद्र पाटील यांनी केले. तपासणी शिबीर यशस्वीतेसाठी HLA TESTCAMP साठी मुंबई येथील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचे ओंकोलोजिस्ट व बोनमॅरो ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. शंतनू सेन व समुपदेशक ज्योती टंडन स्वतः तपासणी केली. तपासणी शिबीर यशस्वीतेसाठी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.