जळगाव शहर महानगरपालिका व केशवस्मृती प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे जळगाव शहर परिसरात बुधवार दि १७.०२.२०२१ रोजी रात्री ९.३० ते पहाटे ३ वाजेपर्यंत बेघर नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ५६ लाभार्थी आढळून आले व त्यांची माहिती घेऊन १ लाभार्थी तयार झाल्याने त्यास केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव येथे आणून दाखल करण्यात आले. सर्वेक्षण कार्यात महानगरपालिका तर्फे श्री.लहासे सो. सौ.गायत्री पाटील, श्री.नितीन जोशी, श्री.राहुल, केशवस्मृती प्रतिष्ठान तर्फे श्री दिलीप चोपडा, श्री दुर्गेश वाणी शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव चे मनोज कुलकर्णी, पराग जोशी, किरण मोरे, सुनील भामरे याचे सहकार्य लाभले.