जळगाव :-  थॅलेसिमिया मुक्त समाज अभियानात केशवस्मृती प्रतिष्ठान व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या सयुक्त विद्यमाने युवकांमध्ये थॅलेसिमिया विषयात जनजागृतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी विनामूल्य तपासणी शिबिरात उद्घाटन प्रसंगी केले.

थॅलेसिमिया, सिकलसेल व हिमोफेलीया रुग्णांसाठी विनामूल्य तपासणी शिबिराचे आयोजनरविवार दि २७ डिसेंबर २०२० रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव या ठिकाणी करण्यात आले होते. शिबिरासाठी औरंगाबाद येथील रक्त विकारतज्ञ डॉ. मनोज तोष्णीवाल यांची विशेष उपस्थिती होती. तसेच जळगाव येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. चेतन पाटील व दंतरोग तज्ञ डॉ. स्वप्नील खडके यांनी मुलांची तपासणी करून दिली. परभणी येथील थॅलेसिमिया विषयातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत पिंपळगावकर, व डॉ अर्चना भयकर यांनी थॅलेसेमिक पालकांचे शंकांचे निरसन करून मार्गदर्शन केले.

कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी सांगितले कि, महाविद्यालये नियमितपणे सुरु झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना थॅलेसिमिया आजाराबद्दल माहिती देण्यात पुढाकार घेईल. डॉ. तोष्णीवाल यांनी थॅलेसिमिया मुक्त समाज अभियानात कोणताही रुग्ण वंचित राहणार नाही यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील असे आश्वासन दिले.

कार्यक्रमात कु. साक्षी प्रदिप जोशी या थॅलेसेमिक विद्यार्थिनीने ई १०वी मध्ये ८५% गुण मिळविल्याबद्दल गौरवचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी मनोगतात हि सुरवात झाली असून अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. समाजातील सर्व स्तरावर यासाठी प्रयत्न केले जाऊन सहकार्याचे आवाहन केले. प्रास्ताविक थॅलेसिमिया प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. सई नेमाडे यांनी तर सूत्रसंचालन आरोग्य विभाग समन्वयक भानुदास येवलेकर यांनी केले.