केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून हरिविठ्ठल नगर येथे महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये शिवणकला प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येत असून केंद्रासाठी आज दि. ३ मार्च २०२१ रोजी रोटरी क्लब ऑफ जळगाव सेन्ट्रलच्या वतीने ४ शिवण मशिन देण्यात आले. शिवणकला प्रशिक्षण केंद्रात स्वतंत्र शिक्षकाची नेमणूक करण्यात आली असून याद्वारे परिसरातील महिलांना याचा फायदा होणार आहे. मशिनचे लोकार्पण करतेवेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव सेन्ट्रलच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा भट, प्रोजेक्ट चेअरमन कमलेशभाई वासवानी, संतोष अग्रवाल, महेंद्र गांधी, राजेश चौधरी, डॉ. विद्या चौधरी, डॉ. प्रिति पाटील, प्राजक्ता वैद्य, केशवस्मृतीच्या संचालिका मनिषा खडके, आरोग्य विभाग समन्वयक भानुदास येवलेकर, जनसंपर्क अधिकारी सागर येवले, सेवावस्ती विभाग व्यवस्थापिका स्नेहा तायडे उपस्थित होत्या. यावेळी रोटरी सदस्यांनी उपक्रमाचे कौतुक आगामी काळात देखील सहयोग करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सेवावस्ती विभागाच्या राधिका गरुड, मंगला अहिरे, ज्योती बारी, कांचन सांगोळे यांनी परिश्रम घेतले.