जळगाव : 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, लैंगिक शोषण, घरघुती हिंसाचार, बाल विवाह, बाल मजुरी, हरवलेली मुले, सांभाळ आणि सुरक्षिततेची गरज असणारी मुले. यांसाठी चाईल्ड लाइन 1098 काम करते. ह्या बाबतची माहिती समुपदेशिका वृषाली जोशी यांनी जळगाव चाईल्ड लाइनआयोजित ओपन हाऊस कार्यक्रमात दिली.
दि : 28/01/2021 रोजी मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिरात जळगाव चाईल्ड लाईन तर्फे ओपन हाऊस कार्यक्रम घेण्यात आला. सुरवातीला मुलांचे खेळ घेण्यात आले, गीतांच्या माध्यमातून त्यांना मनोरंजनात्मक समुपदेशन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला 28 मुली व 42 मुले तसेच पालक उपस्थित होते. मुला – मुलींचे गट विभागून त्यांना “सेफटच, अनसेफ टच” याबाबतची सविस्तर माहिती दिली गेली. मुलांसोबत परिसरातील नागरिकांनी देखील यात उत्स्फूर्त पणे आपला सहभाग नोंदविला. भानुदास माळी व ऋषिकेश वाघ या मेहरूण परिसरातील तरूणांनी तसेच नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सहकार्य केले. उपस्थित मुलांना चाईल्ड लाइन 1098 तर्फे खाऊ वाटपानांतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. ह्यावेळी चाईल्ड लाइनचे टीम मेंबर्स कुणाल शुक्ला, रोहन सोनगडा, हर्षल दुसाने, वैष्णवी खैरनार उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हा समन्वयक श्री.भानुदास येवलेकर यांचे मार्गदर्शन लाभले.