राष्ट्रीय युवक दिनानिमित्त केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पद्वारा  जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील आदिवासी वस्ती व भुसावळ शहरात पासी समाज परिसरात स्वामी विवेकानंद बालसंस्कार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. वस्ती भागातील मुलांना शैक्षणिक अभ्यासक्रमास मदत, संस्कार, अध्यात्म या विषयावर कार्य केले जाणार असून अभ्यासासोबतच खेळ देखील दररोज या वर्गात घेतले जाणार असून दररोज सकाळी १० ते १२ या वेळात भुसावळ व मेहरूण परिसरात समतोल प्रकल्पाचे कार्यकर्ते निशुल्क वर्ग घेणार आहे.

मेहरूण परिसर जळगाव 

आज उद्घाटनाच्या दिवशी भुसावळ शहरात ३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर मेहरूण परिसरात ३० बालक सहभागी झाले. समतोल प्रकल्प रेल्वे स्टेशन वर भरकटलेल्या मुलांना आधार देत आहेत या सोबतच वस्ती भागातील मुलांमध्ये संस्कार रुजावे, शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी या हेतूने बालसंस्कार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला आहे. बालसंस्कार केंद्र प्रारंभ प्रसंगी समतोल प्रकल्पाच्या व्यवस्थापिका सपना श्रीवास्तव यांच्यासह प्रदिप पाटील, विश्वजीत सपकाळे, योगानंद कोळी, महेद्र चौधरी, दिपक पाचपांडे, प्रशांत चौधरी यांनी परिश्रम घेतले.