केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला अकादमीचा यंदा कोरोनाचे सावट असल्याने यावर्षीचा भुलाबाई महोत्सव ऑनलाईन साजरा झाला . यंदा या महोत्सवाचे १८ वे वर्ष साजरे झाले . खानदेशातील लोकसंस्कृतीमध्ये भुलाबाईला अनन्य साधारण महत्व आहे. भुलोजी आणि भुलाबाईला साक्षात शंकर आणि पार्वतीचे रूप मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. यानिमित्ताने सायंकाळी मुली एकत्रित येवून भुलाबाईचे गाणे सादर करत घरोघरी हिंडायच्या या माध्यमातून एकमेकींचे नाते आणि एकोपा टिकण्यास मदत होत असे. परंतु काळाच्या ओघात या लोकपरंपरेस उतरती कळा लागली आहे हे निश्चित. अशा या उत्सवाचे महत्व जाणून केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमी च्या माध्यमातून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले .
या महोत्सवासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कोरोना वॉरीअर, जिल्हा परिचारीका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा लष्करे, ललित कला अकादमीचे प्रमुख श्री. पियुष रावळ, व भुलाबाई महोत्सव प्रमुख वैशाली पाटील आरती व उद़घाटन प्रसंगी उपस्थित होते .
प्रमुख पाहुण्या सुरेखा लष्करे यांनी भुलाबाई उत्सवाचे कौतुक करुन कोरोना काळतील त्यांचे अनुभव सांगून सामाजिक संदेश दिला
या कार्यक्रमात भुलाबाईची आरती प्रांजली रस्से व अनादी आनंदी या मुलींनी केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मृणाल खडके व उत्कर्षा कुरंभट्टी या सदस्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कार्यक्रम प्रमुख वैशाली पाटील यांनी केशव स्मृती प्रतिष्ठानची लोकसंस्कृती जपण्याची भूमिका स्पष्ट केली तर कार्यक्रमाचे आभार केशव स्मृती प्रतिष्ठान संचालिका मनिषा खडके यांनी केले.
कार्यक्रमासाठी तंत्र सहाय्यक म्हणून सुयोग गुरव, सागर येवले व प्रकाश जोशी यांनी केले. बक्षीस घोषणा प्रतिमा याज्ञिक यांनी केली. कार्यक्रमाची सांगता सेजल वाणी व नेहा चव्हाण या बाल कलाकारांनी पसायदानाने केली . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुलाबाई समितीतील प्रीती झारे ,मिना जोशी , राजश्री रावळ , रेवती कुरंभट्टी प्रतिमा याज्ञिक, हेमंत भिडे यांनी परिश्रम घेतले.
या ऑनलाईन कार्यक्रमात एकूण २५ संघाचा सहभाग होता .
खुल्या गटात सर्वांना भुलाबाईचे गीत व त्यावर नृत्य सादर केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला व मुलीनी भुलाबाईच्या पारंपारिक लोकगीताचा समावेश भुलाबाई महोत्सवात केला. मुली व महिला या उत्सवात हिरहिरीने सहभाग नोंदवून मनसोक्त आनंद साजरा केला. या मध्ये ५ ते १५ वयोगटाचा एक गट व १५ वर्षे पुढील खुला गट असे नियोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापिका सौ अपर्णा भट कासार (जळगाव ) ऐश्वर्या कासार ( भुसावळ ) प्रा. कमलताई पाटील (जालना) यांनी ऑनलाईन केले .
या स्पर्धेत प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि , उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले .बक्षीस पात्र संघांची नावे पुढील प्रमाणे आहेत .
लहान गट ( ५ते १५ वर्ष )
प्रथम पारितोषिक :विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीअम स्कूल जळगाव .
द्वितीय पारितोषिक – ब. गो शानभाग विदयालय . जळगाव
तृतीय पारितोषिक : विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक भार्गवी गट
उत्तेजनार्थ .विवेकानंद प्रतिष्ठान माध्यमिक गार्गी गट
खुला गट :
प्रथम विजेते : सखी माऊली मंडळ जळगाव
व्दितीय विजेते : राष्ट्रसेविका राणी लक्ष्मीबाई संघ
तृतीय विजेते : खान्देश कन्या बहिणाबाई ( डॉ . अविनाश आचार्य विदयालय जळगाव
उत्तेजनार्थ : प्रगती गृप ( प्रगती विदया मंदीर जळगाव)