जळगाव रेल्वे स्टेशनवर दि २५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या दरम्यान ३ बालके संशयास्पदरित्या फिरतांना समतोलच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. सदर बालकांना पकडून त्यांची चौकशी केली असता जळगाव शहराच्या सुप्रिम कॉलनी भागातील रहिवासी होते. घरातून कोणालाही न सांगता दुपारी १ वाजता पळ काढला व मिळेल ती रेल्वे पकडून मुंबई गाठायचे त्यांचे नियोजन होते. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता या बालकांचे पालक एम आय डी सी मध्ये हातमजूरी करतात. केवळ बाहेर फिरण्याच्या बहाण्याने हि बालके जळगाव रेल्वे स्टेशनवर आले होते. समतोल प्रकल्पाचे कार्यकर्ते प्रदिप पाटील, विश्वजित सपकाळे व योगानंद कोळी यांनी रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून बालकांच्या पालकांशी संपर्क साधला व पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडून बालकांना पालकांच्या स्वाधीन केले. यावेळी रेल्वे पोलीस सचिन नाईक व पुराणिक यांचे सहकार्य मिळाले.