जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता भुसावळ शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी *केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा ITI परिसर, जामनेर रोड, भुसावळ येथे कोविड केअर सेंटरचा प्रारंभ* आज सकाळी १० वाजता आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, भुसावळ नगरपरिषद आरोग्य अधिकारी डॉ किर्ती फलटणकर , शासकीय ITI चे प्राचार्य गवई, रा.स्व.संघाचे भुसावळ जिल्हा संघचालक डॉ विजय सोनी केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील,सतिश मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कोविड सेंटर मध्ये ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून दाखल रुग्णांसाठी योगासन, सात्विक आहार, तद्न्य व प्रशिक्षीत डॉक्टरांचे उपचार, समुपदेशन करण्यात येणार आहे.  उद्घाटन पूर्वी मान्यवरांनी कोविड सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केली. आमदार श्री संजय सावकारे यांनी आपल्या मनोगतात केशवस्मृती प्रतिष्ठान समाजातील गरजा ओळखुन त्याप्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. या कोविड केअर सेंटरचा भुसावळकर  नागरिकांना निश्चितच फायदा होणार असल्याचे सांगितले. कोविड रुग्णांनी श्री केदार ओक – 9422781375,  श्री प्रविण कुलकर्णी 7588814636 यांना संपर्क साधावा.