गगन सदन तेजोमय...

विमला, वय वर्ष १७, हात जोडून जळगाव स्टेशनवरील समतोलच्या कार्यकत्यांनां विनंती करत होती. मला घरी पाठवू नका, मावशी पुन्हा मला चौफुलीवर टिफिन बँग विकायला पाठवेल. कुठे जायचे? विचारताच तिला काही कळत नव्हते फक्त रडणे… रडणे… आणि धाय मोकलून रडणे…

जळगाव रेल्वे स्टेशनच्या प्लँटफॉर्म नं. २ आणि ३ वर एका मुलगी गांगरलेल्या अवस्थेत फिरताना समतोलच्या कार्यकर्त्यांना दिसली. तिला थांबवून कुठे जायचे आहे असे विचारल्यावर तिला रडूच आले. तिला शांत करून प्रेमाने चौकशी केल्यावर लक्षात आले की मुलीला आई, बाबा नाहीत. तिच्या लहानपणीच दारू खूप पिऊन बाबा वारले आणि त्यांच्या अकाली जाण्याचा आईने धसका घेतला आणि पुढे काही महिन्यांनी ती देखील वारली. अनाथ झालेली विमला आता मावशी आणि आजीकडे राहू लागली. मावशीने मग हाताशी आलेल्या विमलला चौफुल्यावर टिफिन बँग विकायला उभे केले. रोज ५०/६० रुपयांची कमाई करूनच घरी जावे लागे. मधल्या दोन दिवसाच्या काळात काहीच विक्री झाली नाही, त्यामुळे मावशीच्या दहशतीने घाबरून जाऊन विमलने मुंबई सोडली आणि ती जळगाव स्टेशनवर उतरली. कायदेशीर कार्यवाही पूर्ण करताना बाल कल्याण समितीच्या मदतीने तिची समजूत काढली, पत्ता माहित करून तिच्या मावशी, आजीला जळगावला बोलविण्यात आले. ‘कायद्याची समजूत’ त्यांना दिल्याने यापुढे असे काही करणार नाही असे सांगत त्यांनी विमलला मुंबईत घरी घेऊन गेले.

आज विमल तिच्या लहान भावांचा सांभाळ करत मावशीकडे आनंदाने राहते आहे. उंबरठा चित्रपटातील ‘गगन सदन तेजोमय’ या गीताच्या भावार्थाप्रमाणे आयुष्यातील अंधार दूर करून विमलसारख्या असंख्य मुलांच्या आयुष्यात प्रकाश आणून त्यांना अभय देण्याचे काम केशवस्मृतीच्या माध्यमातून सुरू आहे.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत,

केशवस्मृती प्रतिष्ठान

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *